Top News

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिरला सुसाईड बॉम्बर.

Bhairav Diwase. June 05, 2021
वर्धा:- शहरातील बँकेत एकानं बनावट सुसाईड बॉम्बर बनून प्रवेश करत धमकी पत्र देऊन पैशांची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. शुक्रवारी 4 जून रोजी ही घटना घडलीय. पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक करत त्याच्याकडील साहित्य जप्त केलयं. आजारावर उपचारासाठी 55 लाख रुपयांची गरज असून पैसे न दिल्यास सर्वांना संपवण्याची धमकी पत्रातून दिली होती.
वर्ध्यातील सेवाग्राम पोलीस ठाण्यासमोरच सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. या बँकेत तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या व्यक्तीनं बँक शिपायाच्या डोक्याला एअर पिस्टल लावून धमकी देत पैशाची मागणी केली. पुढ त्याला घेऊन येत पिस्टल लपवून ठेवली आणि एक पत्र दिलं.
शिपायानं ते पत्र बँकेच्या अधिकाऱ्याला दिलं. बँकेच्या व्यवस्थापकांनी तकार समजून पत्र वाचलं. त्यातील मजकूर वाचून अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यात आजारावर उपचारासाठी 55 लाख रुपयांची गरज असून मी सुसाईड बॉम्बर असून बँकेत येताच बॉम्ब अ‍ॅक्टीव्ह केलाय. सिक्युरिटी अलार्म वाजवला किंवा पोलिसांना बोलावू नये अन्यथा सर्वांना उडवून देईल, अशी धमकी त्या पत्रात दिली. समयसूचकता दर्शवून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तीचं नाव योगेश कुबडे असं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही माहिती मिळताच लागलीच पोलिस कर्मचाऱ्यांनी बँक गाठली. यात तो इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी कुठलाही वेळ न दवडता त्यास पकडलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील कमरलेला गुंडाळलेलं बनावट बॉम्बसदृष्य साहित्य, चाकू, एअर पिस्टल जप्त केलंय. कमरेला गुंडाळलेल्या सहा लालसर रंगाच्या पाईपच्या कांड्या, वायर वगैरे छोट डिजीटल वॉच जोडलेली बॉम्ब सदृश्य दिसेल असं तयार होतं. त्यात विस्फोटक नव्हते. प्लास्टिकच्या पाईपमध्ये पीओपी भरलं होतं. बॉम्बसदृष्य दिसत होतं. त्यानं एअर पिस्टल ऑनलाईन बोलावल्याचं पोलिसांच्या तपासात पुढं आलंय. दरम्यान, या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने असे का केले? याआधी असे काही केले होते का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने