Top News

भद्रावतीत फिरायला जाणाऱ्या नागरिकांना वाघाच्या धोक्याविषयी जनजागृती करा. Tiger

भाजयुमोचे तहसीलदारांना निवेदन सादर.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहराजवळील जुन्या व निर्जन हायवे परिसरात एका पट्टेदार वाघाचा वावर असल्याचे लक्षात येत आहे. यांच परिसरात दररोज संध्याकाळी व पहाटेच्या वेळेस शहराच्या उत्तरे कड़ील नागरिक फिरण्यासाठी जात असल्यामुळे या वाघापासुन त्यांना जीवित धोखा होण्याचा संभव आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने या नागरिकांना जनजागृती करून वाघापसुन सावध करावे या मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे येथील तहसीलदार महेश शीतोडे यांना देण्यात आले आहे.


सदर जूना हायवे भद्रावती शहरापसुन ते बराज फाट्यापर्यंत बंद करण्यात आल्यामुळें हा परिसर निर्जन झाला आहे.या बंद हायवे चा दुतर्फा मोठमोठी झुडपे व झाडे असल्यामुळे अलीकडे या भागात एक पट्टेदार वाघ अनेकांना आढळुन आला आहे.या रस्त्यावर रहदारी नसल्याने शहरातील गौतम नगर ,कुनबी सोसायटी, गड्डमवार लेआउट , छत्रपती लेआउट , व संताजी नगर ,येथील महिला व पुरुष रोज़ पहाटे व सायंकाळच्या वेळेस फिरण्यासाठी जात असल्याने यावेळेस अनुचीत घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या भागात धोक्याचे फलक लावुन व दूरध्वनीद्वारे नागरीकांना जनजागृती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.यांची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा ईशारा हि निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष इमरान खान ,अमित गुंडावार,युगेश खोब्रागडे, श्रीपाद भाकरे, तौसीप शेख, शिवा मांढरे,व अन्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने