🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

शेतातील विद्युत पोलवर चढलेल्या युवकाचा शॉक लागून जागीच मृत्यू.


(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे
अकोला:- तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी सिरसोली रोडवर असलेल्या शेतात विद्युत पोलवर चढलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला असून नाना ईसमोरे युवकाचे नाव तो पाथर्डी येथी रहिवाशी आहे. सदरे घटनेची माहिती मिळतात गावात शोककळा पसरली आहे. तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील नाना दत्तात्रय ईसमोरे 25 वर्षीय युवक एका शेतात कृषी पंप बंद असल्याने शेतात विद्युत लाईन चालू करण्यासाठी पोलवर चढला असता शॉक लागून पोलवरच मृत्यू झाल्याची घटना आज रविवार 20 जुन रोजी दुपारी एक वाजता सुमारास घडली आहे‌.
प्राप्त माहिती नुसार हा युवक महावितरणच्या कर्मचाऱ्याने स्वतःला खांबावर चढता येत नसल्याने या युवकाला 3 हजार रुपये महिन्याने खांबावर चढण्यासाठी ठेवले होते या भागातील शेतीची विज बंद होती शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन विज पुरवठा सुरु करण्यास लाइनमन ने सांगितल्याची चर्चा असून सदर युवक खांबावर चढल्यावर शॉक लागला आणि काही वेळातच त्याचा खांबावरच मृत्यु झाला. घटनेनंतर मृत्यूमूखी पडलेल्या युवकाचा मृतदेह खांबावर लटकुन होता‌‌.घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत