Click Here...👇👇👇

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू.

Bhairav Diwase
1 minute read
मोहाळा येथील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील मोहाळा येथील ५० वर्षीय महिलेचा शेतात काम करीत असताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना दिनांक १ जुनला मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली असून कमलबाई मधुकर पिदुरकर (५०) असे मृत महिलेचे नाव आहे.
शेतीचे हंगाम सुरू झाल्याने कलूबाई पिद्दुरकर या आपल्या शेतात काम करीत होत्या . दुपारी ३ वाजताच्या सुमारास विषारी सापाने दंश केला. ही बाब महिलेच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच महिलेला उपचारासाठी नवेगाव मोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतू प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे हलविण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला.
महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. महिलेच्या पश्चात पती, मुलगा, सुन, नातीन, विधवा मुलगी असा आप्त परिवार आहे.