(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- ग्रामपंचायत विहीरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये कोरोना लसीकरण मोहीम शंभर टक्के करण्याकरता शासनाच्या निर्देशानुसार राजुरा चे उपविभागीय अधिकारी माननीय खलाटे साहेब यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून मोलाचे मार्गदर्शन केले व नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या या जनजागृती सभेला नायब तहसीलदार गांगुर्डे, सरपंच ॲड. रामभाऊ देवईकर ,तालुका आरोग्य अधिकारी नगराळे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपसरपंच नीलकंठ खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद ,पोलीस पाटील आरोग्य कर्मचारी ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन इरशाद शेख यांनी केले व आभार प्रदर्शन सचिव सूर्यवंशी यांनी केले.
#Vaccine