🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेले 16 लाख रुपये पोलिसांच्या हाती. #Naxalites #gadchiroli #gadchirolipolice

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- जिल्ह्यात अनेक भागात नक्षलविरोधी अभियान गडचिरोली पोलीस नेहमी राबवित असतात. एटापल्ली तालुक्यातील हालेवारा कुंदरी जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना जंगलात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले सोळा लाख रुपये, नक्षल साहित्य गडचिरोली सी 60 पोलीस पथकांच्या हाती लागले. #Gadchiroli

*🍾चंद्रपूर शहरात काल देशी दारू दुकानाचे थाटात उद्घाटन!*
👇👇👇👇👇👇

या डंपमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा सोळा लाख रुपये पोलिसांनी जप्त केले व काही नक्षल साहित्यासह नक्षली बॅनर पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी नक्षलविरोधी केलेली ही मोठी यशस्वी कारवाई यावेळी पाहायला मिळाली. #Gadchirolipolice
जमिनीत पुरलेले 15 लाख 96 हजार रुपये पोलिसांनी केले जप्त.

पोलीस विभागाच्या नक्षलवादी विरोधी c60 जवानांनी नक्षलवाद्यांनी पुरलेल्या 15 लाख 96 हजार रुपये तसंच स्फोटक साहित्य जप्त केलं.

गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली.
नक्षलवादी कशासाठी पैसे, शस्त्र पुरतात?

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केलं जाणारे बांधकाम, रोजगार, तेंदूपत्ता ठेकेदार, सामान्य नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करून ती रक्कम जिल्ह्यात हिंसक कारवाया करण्यासाठी लागणारं शस्त्र, साहित्य, दारुगोळा खरेदी करण्यासाठी नक्षलवादी वापरत असतात. ते जमा करून सर्व पैसा शस्त्र, साहित्य, दारूगोळा ते गोपनीयरित्या ठेवतात.
पोलिसांनी काय काय जप्त केलं?

1 जुलै रोजी पोलिसांनी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेले 15 लाख रुपये, इलेक्ट्रिक बटन, एक स्वीच, तीन डेटोनेटर, दोन वायर बंडल, एक वॉकी टॉकी, नक्षल पॅम्पलेट बॅनर, आणि इतर साहित्य पोलिसांनी जमा केलं. तसंच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणखी सुरु आहे.
यासंदर्भातील अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करतील तसंच त्यांची टीम करेल. या भागात अजून काही डंप आहे का? याचा शोध पोलीस विभाग घेत आहे.