जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

असोलामेंढा तलाव पर्यटन 16 ऑगस्टपर्यंत बंदी. #Saoli


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- असोलामेंढा तलाव पर्यटन 16 ऑगस्टपर्यंत बंदी दमदार पावसामुळे प्रसिद्ध आसोला मेंढा तलाव तुडुंब भरला असून, या तलावावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता 16 आगस्ट पर्यंत आसोला मेंढा तलाव परिसरात फिरण्यास बंदी लावण्यात आली आहे. तसे आदेश मुल चे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी काढले आहे. #Saoli 
ब्रिटिशकालीन असोलामेंढा तलाव 85 टक्के भरले ला आहे. पाण्याच्या ओव्हरफ्लो मुळे जिल्हाभरातील हौशी पर्यटक असोलामेंढा कडे पर्यटनासाठी येऊ शकतात आणि यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता लक्षात घेऊन पाथरी पोलीस स्टेशननी या तलावाचे परिसरात फिरण्यास बंदी आणावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली.
जिल्ह्यात कोरोना ची परिस्थिती असल्याने आणि पोलीस स्टेशन पाथरी यांनी मागणी केल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी आदेश पारित करून असोलामेंढा परिसरात 16 ऑगस्ट पर्यंत फिरण्यास मनाई केली आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत