जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अस्वलीच्या हल्लात ४ जण जखमी. #4injured #bear #attack

2 गंभीर जखमी तर 2 जखमी; सातारा तुकुम येथील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सातारा तुकुम येथील कक्ष क्रमांक-४३६,कक्ष क्रमांक-४३५ येथे गुराख्यांनी आपले गुरे चरायला नेले असता दाट जंगलातील झुडूपात दबा धरुन बसलेल्या अस्वलाने हल्ला केला असता पहिल्या घटनेत सातारा तुकुम कक्ष क्रमांक-४३६ येथे गुरे चारणार्‍या ५७ वर्षीय आणि ५४ वर्षीय इसम अस्वलाच्या हल्लात गंभीर जखमी झाले.  #4injured 
तर दुसऱ्या घटनेत सातारा तुकुम कक्ष क्रमांक-४३५  (FDCM)च्या जंगलात गुरे चारणार्‍या ४५ वर्षीय आणि ३२ वर्षीय इसम अस्वलाच्या हल्लात जखमी झाले. हि घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. #bear #attack
सविस्तर वृत्त असे की, सातारा तुकुम येथील  विलास तुकाराम पेंदोर वय ५४ वर्ष,  सीताराम किसन मडावी वय ५७ वर्ष यांनी कक्ष क्रमांक-४३६ च्या रेगुलर जंगलात गुरे  चारण्याकरीता नेले असता दाट झुडूपात दबा धरुन बसलेल्या अस्वलाच्या हल्यात गंभीर जखमी झाले.
तर दुसऱ्या घटनेत सातारा तुकुम येथील प्रफुल रघुनाथ सिडाम वय ४५ वर्ष राहणार सातारा तुकुम, रुपेश गजानन कुळमेथे वय. ३२ वर्ष  राहणार भानसी तालुका सावली यांनी सातारा तुकुम कक्ष क्रमांक-४३५  FDCM च्या जंगलात गुरे चारण्याकरीता नेले असता झुडूपाच्या आड दबा धरुन बसलेल्या अस्वलाने या दोघांवर हल्ला चढविला या  हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. 
सदर घटनेची माहिती वनविभागास मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी व जखमी पर्यंत पोहचले. चारही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
गंभीर जखमी विलास तुकाराम पेंदोर यांच्या कुटुंबांना वनविभाग कर्मचारी मडावी यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आली आहे.तर बाकीच्यांनाही तातडीने मदत देण्यात येणार असल्याचे वनविभागाने कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत