आदिवासी व गैर आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्याची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांना शेत जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे तसेच शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे याकरिता वंचित चे नेते राजु झोडे , अरविंद सांदेकर यांच्या नेतृत्वात नागभीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
पिढ्यान् पिढ्या कसत असलेल्या आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे शासनाने दिलेले नाही.शेतकऱ्यांनी शेत जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे याकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे दावे टाकलेले आहेत. दावे टाकले असतानाही व जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही वन विभागाचे अधिकारी गुरुप्रसाद व त्यांचे कर्मचारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना मारझोड करणे, शेतीचे नुकसान करणे, शेतकऱ्यांना धमकी देणे असे प्रकार करत आहेत. अशा शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकार्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे. शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तात्काळ देण्यात यावे. वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी द्वारा नागभीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून वन प्रशासन व प्रशासन विरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले नाही व शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळाले नाही तर जिल्हा कचेरीवर हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी शासन व प्रशासन विरोधात तीव्र मोर्चा काढेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी चे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी शासन व प्रशासनाला धरणे आंदोलनाच्या माध्यमातून दिला.
धरणे आंदोलनाचे नेतृत्व वंचितचे नेते अरविंद सांदेकर यांनी केले. धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, सुभाष थोरात, अश्विनी ताई मेश्राम, विलास श्रीरामे, शैलेंद्र बारसागडे तथा अन्य वंचित चे पदाधिकारी व असंख्य शेतकरी उपस्थित होते.
#Movement