Top News

सिंदेवाही पोलिसांनी अवैध धंदेवाल्यांविरुद्ध फुंकले रणसिंग. #police

एका रात्रीमध्ये केला तब्बल 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- दिनांक 03/07/2021 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर व पोलीस पथक यांनी गस्ती दरम्यान नागपूर येथून तेलंगणा राज्यामध्ये कतली करिता जाणाऱ्या आयशर ट्रक व बोलेरो पिकप या दोन वाहनांना ताब्यात घेऊन त्यामध्ये पाय बांधून कोंडून ठेवलेल्या एकूण 26 गोवंश यांची सुटका करून त्यांना सुखरूप गोशाळेमध्ये जमा केले आहे. सदर कारवाई मध्ये गोवंश व वाहने असे मिळून एकूण 23 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.


सदर कारवाई करत असते वेळी एक्स महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन सिंदेवाही कडून मूल च्या दिशेने सुसाट वेगाने जात असताना सदर वाहनाचा ठाणेदार योगेश घारे व त्यांच्या पथकाने पाठलाग करून सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये रॉकेट संत्रा देशी दारू च्या एकूण 30 पेट्या किंमत 300000/- रुपये व स्कॉर्पिओ वाहन किंमत 12,00000/- रुपये असा एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त केला आहे.


अशाप्रकारे सिंदेवाही पोलिसांनी एकूण 38 लाख 45 हजाराचा मुद्देमाल एका रात्रीच जप्त केलेला आहे. सिंदेवाही पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून नमूद दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद करून आरोपींना ताब्यात घेतलेले असून पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.
#police

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने