Top News

"त्या" वायरल फोटोतून दिसली शिक्षकांची असंवेदनशीलता. सर्व स्तरातून "त्या" शिक्षकाचा निषेध. #socialmedia

ब्रम्हपुरी:- मृत्यू कुणासाठीही दुःखद असतो. कोऱ्या आणि अजाणत्या वयात झालेला मृत्यू तर सर्वांनाच चटका लावून जातो. मात्र या मृतकाचे परिस्थितीचा लाभ देऊन त्याचा सोशल मीडियावर गवगवा करणारे मात्र अपवादात्मक असतात. #bramhapuri
या पार्श्‍वभूमीवर ब्रह्मपुरी येथील गांधी नगर मधील एका लहानग्या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि या मृतकाचे कुटुंबियांना त्याच्या शिक्षकांनी दोन हजार रुपयांची भरघोस मदत दिली. किती दिली हा भाग वेगळा असला तरी, ज्या पद्धतीने ही मदत दिली, त्यावरून या शिक्षकांची असंवेदनशीलता निर्माण करणारे असून सोशल मीडियावर या शिक्षकांचा सर्वत्र निषेध होत आहे. #socialmedia
मदत देताना या शिक्षकांनी मृतक बालकाला खुर्चीवर बसवून, या बालकांच्या पालकांना, एखाद्या नेत्याप्रमाणे दोन हजार रुपयाची मदत देत त्यांचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर वायरल केले.
आज पर्यंत रुग्णांना मदत करतानाचे फोटो बघितले पण आज इतक्या खालच्या स्थरावर जाऊन फोटो काढतांना नाही बघितले, ती प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने