जाहिरात... Advertisement... विज्ञापन

आमदार साहेबांना माणिकगड कंपनीचा पुळका? #chandrapur


४० वर्षांपासून पिडित कुटुंबाच्या घरातला अंधार दूर करण्याचा प्रहारचा प्रयत्न.

पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
आमदार साहेबांनी सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी कंपनीची वाह वाह....
कोरपना:- दि. २ जुलै ला पालकमंत्री गडचांदूर येथे विविध कामाचे भूमिपूजन करण्यास आले असता प्रहार संघटनेद्वारे काही नागरिकांच्या समस्या बाबत निवेदन पालकमंत्री, खासदार, आमदार, आणि जिल्हाधिकारी यांना दिले. मात्र जिल्हाधिकारी साहेब यांना बंगाली कॅम्प बाबत सविस्तर माहिती देत असतानाच आमदार साहेब जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी जसे काही माणिकगड कंपनी चे प्रतिनिधी बनून आले असे बोलताना दिसले. मात्र राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अरुण निमजे यांनी मात्र कंपनी कडून होणाऱ्या अन्याया बाबत मूलभूत सुविधा व गरीब कामगार यांच्या परिवारासाठी न्याय मिळावा याची दखल घेतली. #chandrapur #manikgad
40 वर्षांपासून अंधारात असलेल्या बंगाली कॅम्प ला वीज, पाणी या साठी प्रहार जनशक्ती पक्षाने अनेक निवेदन, पत्रव्यवहार केले त्याच हेतूने तिथे नळ लावून पाण्याची व्यवस्था झाली. मात्र बोरिंग मारून देण्यास नगर परिषद टाळाटाळ करीत आहे. पाणी हे मानवाची जिवनाश्यक वस्तू असून सुद्धा मुख्यधिकारी जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशाची मागणी करीत आहे. पण तसे पत्र मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाला देऊन लेखी आदेशाची मागणी केली नाही. विजेसबंधी संपुर्ण प्रक्रिया झाली असून निधी सुद्धा मंजूर झालेला आहे. फक्त आदेश देणे बाकी आहे.
याबाबत जिल्हाधिकारी साहेंबानी कंपनीच्या व्यवस्थापका सोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पण आमदार साहेबांचे खरे रूप जनतेसमोर आलेत. आमदाराने जनतेला वीज, पाणी मिळवून देण्यासाठी जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी माणिकगड कंपनीची बाजू घेतल्याने गडचांदूर वासियांमध्ये राग निर्माण झाला असून बंगाली कॅम्प वासियानी आमदारांचा निषेध नोंदविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत