सोमवारी मिळेल 98 परवाने; दिवाणे झाले खुश.#chandrapur

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- 27 जून ला राज्य मंत्रिमंडळाने चंद्रपुरातील दारू बंदी उठविण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ८ जुनं ला या संदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आला. #chandrapur
दारूची दुकाने आत्ता सुरू होईल नंतर सुरू होईल याची प्रतीक्षा मद्यपी बघत होते. शासन निर्देशाप्रमाणे 11 जून रोजी उत्पादन शुल्क आयुक्त, मुंबई यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांच्या नावे काढलेल्या आदेशांमध्ये दिशानिर्देश करीत व काही सूचना जाहीर करत कागदपत्र सादर करण्याचे कामे सुरू झाले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी पूर्णतः हटविल्यानंतर प्रशासनाने दारूविक्री परवाना धारकांना नूतनीकरनासाठी आवाहन केले त्यानंतर परवाना धारकांनी आपले परवाने नूतनीकरण करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात कागदोपत्री पूर्तता केली.
कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर सोमवार 5 जुलै पासून चंद्रपूर जिल्ह्यातील 98 दारू परवाने देण्यात येणार आहे. हे 98 दुकाने पहिल्या टप्प्यात देणार असून उर्वरित परवाने दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे. मद्यप्रेमींना आता पुन्हा काही दिवस वाट बघावी लागणार आहे.