Click Here...👇👇👇

२६ जुलैपासून आयुध निर्माणीचे कर्मचारी बेमुदत संपावर. #Indefinitestrike

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ देशातील सर्व आयुध निर्माणीतील कर्मचारी २६ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती आॅल इंडिया डिफेंस एम्प्लाईज फेडरेशनचे सहसचिव रवींद्र रेड्डी यांनी दि.३० जून रोजी येथील आयुध निर्माणीच्या गेट क्र. ३ च्या समोर आयोजित जनजागृती सभेत दिली.
  भारतीय सेनेचा चौथा स्तंभ असलेल्या आयुध निर्माणींचे खाजगीकरण करण्याचा अंतिम निर्णय विद्यमान केंद्र सरकारने घेतला असून सरकारच्या या कामगार विरोधी निर्णयाचा चांदा आयुध निर्माणीतील सर्व कामगार संघटना व संयुक्त संघर्ष समितीतर्फे जोरदार विरोध करण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात देशातील ४१  आयुध निर्माणीतील सर्व कर्मचारी दि.२६ जुलै पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या आंदोलनाची माहिती देण्याकरीता व कामगारांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरीता आॅल इंडिया डिफेंस एम्प्लाइज फेडरेशनचे सहसचिव रवींद्र रेड्डी यांच्या सभेचे संयुक्त संघर्ष समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते.
      सभेला आयुध निर्माणी मजदूर युनियनचे अध्यक्ष शितल वालदे, महासचिव गुलाब चौधरी, एम्प्लाइज युनियनचे महासचिव राजेश यादव, भारतीय सुरक्षा कर्मचारी संघाचे सचिव जितेंद्र नायक, स्वतंत्र युनियनचे अध्यक्ष अविनाश दिग्विजय, कार्य समिती सदस्य प्रकाश हरिदासन, राम पुंडे, पप्पू गेडाम, विवेक वाढई, सदानंद वाघ, प्रदीप गोखरे, सूरज, गणेश, दीपक आणि आयुध निर्माणीचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
#Indefinitestrike