Top News

खाद्य तेल व किराणा माल अधिक भावाने विकणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही करा. #Highprices

अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांची मागणी.

मा. तहसिलदार साहेब भद्रावती
यांना दिले निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- मागच्या वर्षी पासून कोव्हिड -१९ च्या काळात सर्व जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती गगणाला पोहचल्या आहेत. दाळ, खाद्य तेलाच्या किंमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या होत्या. परन्तु आता लॉकडाऊन उघळल्यानंतर सर्व किराणा माल, दाळ, खाद्य तेल यांच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या आहे.
   परंतु अनेक ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीनूसार असे दिसुन येते की, किराणा दुकानदार, होलसेलर यानी अजुनही किंमत कमी न करता मनमानी भावाने विक्री करत आहे. त्यामुळे सर्व साधारण ग्राहकांना किंमत कमी झालेली असुन सुद्दा जादा भावाने विकत घ्यावे लागत आहे. यात ग्राहकाची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे.
     त्यामुळे सर्व होलसेलर आणि किरकोळ किराणा दुकानदारांकडे असलेला किराणा माल, उपलब्ध साठा, खरेदी किंमत, खरेदी तारिख, जुनी किंमत आणि नविन खरेदी-विक्री किंमत याची पळताळनी करून दोषी दुकानदारांवर कठोर कार्यवाही करावी.
     निवेदन देतांना वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, गुलाब लोणारे, गोपिचंद कांबळे आणि प्रविण चिमुरकर यांची उपस्थिती होती.
#Highprices

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने