जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बर्थडे आहे लेकाचा, जल्लोष साऱ्या गावाचा.#birthday #cake #arrest

तलवारीने केक कापल्याने बापाला अटक.

मुंबई:- सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असतानादेखील काही नागरिक मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन करत लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमवून लग्न आणि वाढदिवस साजरे केले जात आहेत. यामध्येच एक व्हिडिओ समोर आला आहे. #birthday
या व्हिडिओमध्ये काही लहान मुले एकत्र येऊन केक कापताना दिसत आहेत.तसेच आरोपीने तलवारीचे प्रदर्शन करत केक कापला आहे. यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे. वाढदिवसाचा हा व्हिडीओ 30 जून रोजी पोलिसांनी पहिला. यामध्ये काही मुले तलवारीने केले कापताना दिसत आहेत.  #cake #arrest
या प्रकरणी मुंबईतील राजीव गांधी नगर भागातील बंगालीपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपास करून दोन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे अफझल अलाउद्दीन शेख आणि अशरफ शेख अशी आहेत.
काय आहे प्रकरण.....

या आरोपींनी 29 जून 2021 रोजी रात्री 10 च्या सुमारास आपल्या लहान मुलाच्या वाढदिवसाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. या वाढदिवसाच्या कर्यक्रमाला अन्य लहान मुलांनाही एकत्र जमवले होते. तसेच तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या आरोपींवर कोरोना साथीच्या काळात मोठ्या संख्येनं एकत्रित येणे, जमावबंदी असूनही अशाप्रकारचा वाढदिवस साजरा करणे. लहान मुलांना एकत्र करत त्यांच्या जीवाशी खेळणे, अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. #police

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत