हत्तीरोग दुरीकरणासाठी देणाऱ्या औषधांचे सेवन करा - संजय गजपुरे #Elephantiasis

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र सुरुवात करण्यात आली आहे. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे याची सुरुवात जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी गोळ्या सेवन करुन केला. सोबतच कुटुंबातील सर्व सदस्य व सरस्वती ज्ञान मंदिर येथील सर्व शिक्षकांनी या गोळ्यांचे सेवन केले.


 हत्तीरोगाच्या प्रतिबंधासाठी यावर्षी हत्तीरोगविरोधी तीन प्रकारची औषधे नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये गरोदर माता , दोन वर्षाखालील बालके , अतिगंभीर रुग्ण वगळता सर्वांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष देखरेखीत औषधे खाऊ घालण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी या गोळ्यांचे सेवन करण्याची विनंती जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी केली आहे.
      यावेळी प्रा.आ.केंद्र नवेगाव पांडव  च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका मडावी , आरोग्य सहाय्यक वामन बारापात्रे , आरोग्य सेविका अर्चना निखार , आशा वर्कर दृषाली खोब्रागडे व शिल्पा अमृतकर , सरस्वती ज्ञान मंदिर चे मुख्याध्यापक गोकुल पानसे , सहा. शिक्षक आशिष गोंडाने , कु.आशा राजुरकर,  किरण गजपुरे, पराग भानारकर, सतिश जिवतोडे यांची उपस्थिती होती.
#Elephantiasis