5 वी आणि 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर... #Scholarshipexamination

🆘

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.

मुंबई:- दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर आता 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर या परीक्षेची तारीख जाहीर झाली असून याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. #Scholarshipexamination 🆘

दोन्ही वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा आता 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. कोरोना नियमांचं पालन करुन ही परीक्षा होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. ही परीक्षा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं मान्यता देण्यात आल्याचं गायवाड यांनी म्हटलं आहे. 🆘

सन 2020-21 च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून 8 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा, असं वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 🆘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत