🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

ब्रम्हपुरीत सहा जुगाऱ्यांना अटक, तिघे फरार. #Arrested #Gambling


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- येथून जवळच असलेल्या कहाली रोड वीटभट्टीजवळ जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच धाड टाकली. यावेळी दोन लाख ९९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून तीन जण फरार झाले आहे. ही कारवाई ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने केली. #Arrested
कारवाईत प्रवीण दोनाडकर रा. दिघोरी, आशिष पिल्लेवान, आदर्श बनकर, आजाद लोखंडे तिघेही रा. कहाली, नरेंद्र मेश्राम, उमेश रावेकर दोन्ही रा. ब्रह्मपुरी असे एकूण सहा आरोपी जुगार खेळताना आढळून आले, तर उर्वरित तीन आरोपी हे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. #Gambling
कारवाईत वीस हजार ६०० रुपये नगदी तसेच आरोपींच्या ताब्यातील मोबाइल एकूण किंमत २४ हजार रुपये तसेच घटनास्थळी मिळून आलेल्या एकूण पाच मोटारसायकल किंमत दोन लाख ५५ हजार रुपये असा एकूण दोन लाख ९९ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटनेतील आरोपींवर मुंबई जुगार कायदा कलम १२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अनुज तारे, पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, पोहेका नरेश रामटेके, रवींद्र पिसे, नापोका उमेश बोरकर, मुकेश गजबे, नितीन भगत, पोका नरेश कोडापे, प्रमोद सावसाकडे, प्रकाश चिकराम यांच्या पथकाने केली.