जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

आंबेधानोरा येथील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचे जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांच्या हस्ते भूमिपूजन. #bhoomipujan #zpmember


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रात जलदगतीने कामे करीत आहेत. #bhoomipujan #zpmember
अशातच आज आंबेधानोरा येथे जन सुविधा योजना अंतर्गत (मारोती लांडे ते गजानन लांडे यांच्या घारापर्यत) या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन जि. प. सदस्य त्यांच्या हस्ते पार पडले. कोरोना काळात अनेक कामे ठप्प पडलेली असली तरी राहुल संतोषवार यांनी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये विविध विकासाभिमुख कामे करून गावाचा विकास करीत आहेत.
आंबेधानोरा येथील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम मंजूर केले असल्याने नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानलेले आहे.
कार्यक्रमावेळी उपस्थित सरपंच सौ. निरंजना मडावी, उपसरपंच रमेश हलमलवार, सदस्य सौ. ज्योती कज्जपवार सौ.सुमित्रा जुमानाके, शारदाताई रेगुलवार, व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत