बल्लापूरातील वाढती गुंडगीरी संपूर्ण जिल्हासाठी धोकादायक:- आ. किशोर जोरगेवार. #firing #Chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपुर:- चंद्रपूर शहर हे नेहमी शांतीप्रीय राहिली आहे. मात्र बल्लारपूरातील गुन्हेगांकडून येथील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे खपवून घेणार नाही असा ईशारा देत बल्लारपूरातील दादागीरी ठेचून काढा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहे. #firing #Chandrapur

बुरखा घालून आलेल्या युवकाच्या गोळीबारात एक युवक जखमी.


      बल्लारपूरातील आकाश अंदेवार याच्यावर चंद्रपूरातील रघुवंशी काॅम्पलेक्स येथे गोळ्या झाडण्यात आल्यात. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर ठिकाण गाठत पोलिसांशी चर्चा केली. तसेच या प्रकारानंतर दहशतीत असलेल्या येथील व्यापा-यांशीही चर्चा केली.
    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बल्लारपूरातील वाढत्या गुंडाराजवर चिंता व्यक्त केली. बल्लारपूरातील दादागीरी जिल्हातील इतर भागात पसरत चालली असून त्यावर अंकुश लावण्याची गरजही यावेळी त्यांनी बोलूून दाखवली. बल्लारपूरातील गावगुंडाकडे बंदुकीसारखे जिवघेणे हत्यार येतात कशे याचीही पोलिस विभागाने चौकशी करण्याच्या सुचना त्यांनी पोलिस प्रशासनाला केल्या आहे. बल्लापूरातील वाढती गुंडगीरी समजासह संपूर्ण जिल्हासाठी धोकादायक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत