मनसे आणि भाजप युती झाल्यास गैर काय? #BJP #MNS

Bhairav Diwase
आ. मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत.
चंद्रपूर:- भाजपचे पहिल्या फळीतील नेते सुधीर मुनंगटीवार यांनी भाजप- मनसे युतीवर मोठं विधान केलं आहे. भविष्यात आमची युती झाली तर त्यात गैर काय? असं आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राज ठाकरे यांचा मलाही फोन आला होता. येत्या काही दिवसात मी त्यांची भेट घेईन, असं आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगतिलं. #BJP #MNS

🥛जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय सतरा वर्षांचा "भुजंग"

आ. मुनगंटीवार यांच्या या विधानाने भाजप-मनसे युतीच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर त्यात गैर काय? भविष्यात काँग्रेस आणि भाजप सोडून कोणीही एकत्र येऊ शकतो, असं आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ॲागस्टच्या पहिल्या आठवड्यात आ. सुधीर मुनगंटीवार हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.