17 वर्षीय युवतीवर बळजबरीचा प्रयत्न. #Debauchery

29 वर्षीय युवकाला विनयभंग व बळजबरी करण्याच्या आरोपात अटक.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सर्वत्र लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असुन राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागातही ह्या घटनांचे लोण पसरले आहे की काय असे वाटावे अशी घटना तालुक्यातील धीडशी येथे घडली असुन गावातील अंदाजे 29 वर्षीय युवकाला विनयभंग व बळजबरी करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राजुरा तालुक्यातील धीडशी येथे अंदाजे 17 वर्षीय युवतीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न गावातीलच एका 29 वर्षीय युवकाने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

🥛जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय सतरा वर्षांचा "भुजंग"

सदर युवतीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. मुलगी घरी एकटीच असल्याचे लक्षात येताच आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. घरी तिच्या घरीज कुणीही नसल्याने युवकाने बहाण्याने घरात प्रवेश करून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक घडलेल्या प्रसंगाने डगमगून न जाता युवतीने प्रतिकार केला व आरडाओरड करण्यास सुरुवात करताच आरोपी 29 वर्षीय युवक पसार झाला.
आई वडील घरी येताच मुलीने त्यांना आपबीती सांगितली व तत्काळ राजुरा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपीवर पोस्को सह कलमान्वये  दाखल केला असुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. राजुरा पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत. #Debauchery

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने