Click Here...👇👇👇

'त्या' युवकाविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल. #Crime

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चामोर्शी:- दलित युवतीस कथित प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचे यथेच्छ लैंगिक शोषण करून, ती गरोदर राहिल्यावर लग्नासाठी श नकार देऊन तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या येणापूरच्या युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अखेर दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सुरुवातीला पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत होती. मात्र भीम आर्मी संघटनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र डोहणे यांच्या नेतृत्वात प्रकरण लावून धरल्याने पोलिसांना कारवाई करने भाग पडले. #Crime
💥प्रियकराच्या हातून प्रियसीची हत्या? सदर घटना संशयाच्या भोवऱ्यात.

🥛जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय सतरा वर्षांचा "भुजंग"
चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथील दिक्षा बांबोळे या दलित समाजातील युवतीला त्याच गावात फोटो स्टुडिओ आणि सेतू केंद्र चालवणाऱ्या विनोद जक्कुलवार याने कथित प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने लग्नाचे वचन दिल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवून आपले सर्वस्व त्याच्या स्वाधीन केले.यातून ती गरोदर राहिल्यावर तिने लग्नासाठी त्याच्याकडे तगादा लावला.तो भामटा निघाला.त्याने 'बहिणीचे लग्न झाल्यावर आपण लग्न करू'अशी भुलथाप देऊन तिला गर्भपात करण्यास सांगितले.त्याच्यावर विश्वास कायम ठेवून तिने गर्भपात केला.
नंतर त्याने 'आपले काहीच संबंध नव्हते ' अशी 'तो मी नव्हेच 'ची भूमिका घेऊन तिच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला.तिच्या पायाखालची जमीनच सरकली असणार! तिला जगणं मुश्किल वाटलं !तिने राहत्या घरी गळफास घेऊन जग सोडले. अभ्यासात अत्यंत हुशार असलेली ही युवती चंद्रपूरला डी फार्म करत होती.तिच्या मृत्यूने अख्खे गाव हळहळले.
 
        आरोपी युवक मोठया राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने पोलीस सुरुवातीला कारवाई करायला धजावत नव्हते. मात्र भीमआर्मी भारत एकता मिशनचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख जितेंद्र टी.डोहने, गोंडपीपरी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अरुण वासलवार, समाज समता संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष इंजिनियर नरेंद्र डोंगरे, दस्तक न्यूजचे संपादक मुन्ना तावाडे यांनी हे प्रकरण लावून धरले. त्या प्रकरणाची बातमी न्यूज पेपर, न्यूज पोर्टलनी प्रकाशित केली. नंतर पोलिसांनीना कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास अहेरी उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनात होत आहे.