चरायला गेलेल्या गाईला केले ठार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील घोसरी जंगल परिसरात पट्टेदार वाघाची दहशत पसरली असून सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान वाघाच्या हल्ल्यात एक गाय ठार झाली आहे.
ताडोबा अभयारण्याला लागून असलेले घोसरी हे वनराईने वेढलेले गाव आहे. या गावाच्या परिसरात सध्या पट्टेदार वाघाची दहशत पसरली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घोसरी येथील रमेश बापुराव गजभे या शेतक-याची दुधाळू गाय पट्टेदार वाघाने ठार केली. त्यामुळे त्यांचे ५० हजाराचे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे एक आठवड्यापूर्वीच एक दीड वर्षीय नर पट्टेदार वाघ घोसरी गावाजवळ तामसी बिटात तामसी तलावाजवळ मृतावस्थेत आढळून आला होता.
#Tigerattack
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत