Click Here...👇👇👇

आ. सुधीर मुनगंटीवार यांचेकडून उमरी पोतदार येथील मृत्यू पावलेल्या मनोज उपरे च्या कुटुंबाला आर्थिक मदत. #Pombhurna

Bhairav Diwase
🟥
चंद्रपूर:- उमरी पोतदार येथील रहिवासी स्व. मनोज यादव उपरे वय वर्ष (३४) अल्पशा आजाराने त्यांचा बळी घेतला. दिनाक २३/०७/२०२१ ला त्यांचा दुःखद निधन झाले. घरचा कमवता पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट तुटून पडले. त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि दोन लहान मुली असा संसार सोडून ते कायम चे देवाघरी गेले. यातच त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्यास "पाहणारे डोळे आणि मदतीचे हात बहुद्देशीय सामाजिक संस्था", उमरी पोतदार ही संस्था धावुन आली. अनेक समाज माध्यमातून या संस्थेने त्यांना मदत  मांगण्यास सुरुवात केली अनेक लोकांनी मदत सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून त्या कुटुंबाला आँनलाईन गुगल पे / फोन पे च्या सहायाने मदत कार्य सुरू आहे. या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यास "पाहणारे डोळे आणि मदतीचे हात" या संस्थे नी लगेच धाव माजी कॅबिनेट मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार याच्याकडे घेतली भाऊंनी लगेच फोन जिल्हा परिषद सदस्य राहुल भाऊ संतोषवार यांना फिरवला व त्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्यास सांगितले. सुधीर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल भाऊ संतोषवार लगेच या संस्थेच्या पदाधिकऱ्यांशी भेट घेतली आणि त्या परिवाराला प्रत्यक्ष गृहभेट देऊन तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली व त्या परिवाराला आश्वासन देण्यात आले की आम्ही तुम्हाला शासकीय योजना मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. 

 यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य राहुल भाऊ संतोषवार, उपसरपंच मंगेश उपरे, बंडू लेनगुरे, व संस्थे चे अंकुश उराडे, निखिल झबाडे, निखिल झुरमुरे, संदिप यम्पलवार, अविनाश लेनगुरे, भिमराव मेश्राम, विक्रम लेनगुरे चंद्रकांत सिडाम, मनिष ठाकरे,नदिम कुमरे, अमित कुमरे, चेतन कावळे, अंकुश लेनगुरे उपस्थित होते.
🟥 #Pombhurna