Top News

चंद्रपूर, गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा. #Gesture



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- विदर्भात मुसळाधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे. IMD कडून विदर्भात दोन दिवस ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. चंद्रपूर, गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर, नागपुरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर विभागाचे संचालक मोहनलाल शाह यांनी ही माहिती दिली.
विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा एकीकडे मुंबई आणि कोकणात मुसळाधार पाऊस पडतोय, तर दुसरीकडे विदर्भातंही मुसळाधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात ॲारेंज अलर्ट जारी केलाय. विदर्भातील गडचीरोली आणि चंद्रपुर या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाची शक्यता आहे, असं याबाबत नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी माहिती दिली.
चंद्रपूरमध्ये मुसळधार.......

चंद्रपूर जिल्ह्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरु होती. साडेबाराच्या सुमाराास पावसाने पुन्हा वेग पकडला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत धान पिकाला गरज अशाच मोठ्या पावसाची गरज होती. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे 42 टक्के एवढा पाऊस पडलाय. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडून 500 क्युमेक्स एवढा जल विसर्ग नदी प्रवाहात सोडला जाणार आहे. पुढच्या काही तासात वैनगंगा नदीकाठच्या गावांना व शेतीला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील लाल नाला सिंचन प्रकल्प 75 टक्के भरला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.   #Gesture

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने