Top News

भेदोडा नाल्यावरुन दुचाकीसह शेतकरी गेला वाहून. #Bike #farmers


नाल्यांना पूर,शेकडो गावात शिरले पाणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- दोन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाची बुधवारपासून झळ सुरू झाली. गुरुवारी पावसाने वेग धरून मुसळधार बरसल्याने नदी, नाले फुगले तर अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद झाल्याने नागरिक अडकले. वाहतूक ठप्प झाली. पावसाने धुवाधार झोडपल्याने चंद्रपुरातील वर्दळीच्या मार्गावर तर जणू नदीन अवतरल्याचे दिसून आले. जनजीवन विस्कळीत झाले. गुरुवार जिल्ह्यात २४ तासात ४४७.७. मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. #Bike #farmers

💥राजुरा-गडचांदूर, राजुरा-कढोली, राजुरा-मात्रा, राजुरा-सुमठाणा, सुमठाणा-बोडगाव मार्ग बंद. 
👇👇👇👇👇👇

⛈️⛔चंद्रपूर, गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा.
👇👇👇👇👇👇

चंद्रपूरसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वेग धरलेल्या पावसाने दुपारी १.३० वाजपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे शहरातील सर्व वस्त्या जलमय झाल्या. रामनगर ते बिनगेट मार्गावरील अनेकांच्या घरात पाणी शिरले. शहरातील मुख्य वस्ती, तुकूम, बाबूपेठ, बंगाली कॅम्प या परिसरातही अशीच स्थिती होती. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरही जलमय झाला.
लाल नाला प्रकल्पाचे सहा गेट उघडले....

पावसामुळे लाल नाला प्रकल्पाचे सहा गेट उघडण्यात आले. गोसीखुर्द धरणातून १६० क्युमेक्स पाणी सोडले जात आहे. पावसामुळे आज दुपारी २ वाजतापासून जल विसर्गाची पातळी ५०० क्युमेक्सपर्यंत वाढविण्यात आली. नदीकाठावरील गावांनी काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
सर्व तालुक्यांत पावसाची झळ....

सोयाबीन व कपाशीच्या पेरण्या आटोपल्या. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. मात्र, जुलै महिन्यातील दोन आठवडे कोरडे गेल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली. पऱ्हे रोवणीच्या स्थिती असूनही पाऊस नव्हता. बुधवारपासून सर्वच तालुक्यात झड सुरू आहे. झडीच्या पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. त्यामुळे धान उत्पादक तालुक्यात रोवणीला वेग येण्याची शक्यता आहे.
शेतकरी दुचाकीसह वाहून गेला....

राजुरा : भेदोडा येथील चंदू बिल्लावार (५५) हा शेतकरी गावाजवळील नाल्यावर आलेल्या पुरात आपल्या दुचाकीसह वाहून गेला. ही घटना गुरुवारी घडली. चंदू हा गावाकडे दुचाकीने जात होता. भेदोडा नाल्याला पूर असतानाही त्याने आपली दुचाकी पाण्यात टाकली आणि पुरात दुचाकीसह वाहून गेला, अशी माहिती प्राप्त झाली आहे. राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून शोध घेणे सुरू आहे. या शेतकऱ्याचे कृषी केंद्र आहे.
चंद्रपूरमध्ये मुसळधार.......

चंद्रपूर जिल्ह्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरु होती. साडेबाराच्या सुमाराास पावसाने पुन्हा वेग पकडला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत धान पिकाला गरज अशाच मोठ्या पावसाची गरज होती. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे 42 टक्के एवढा पाऊस पडलाय. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडून 500 क्युमेक्स एवढा जल विसर्ग नदी प्रवाहात सोडला जाणार आहे. पुढच्या काही तासात वैनगंगा नदीकाठच्या गावांना व शेतीला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील लाल नाला सिंचन प्रकल्प 75 टक्के भरला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने