Click Here...👇👇👇

कहाणी एका अनोख्या जिवती तालुक्यातील अतीदुर्गम गोंदापूर गावाची. #Gondapur

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील तेलंगनाच्या पूर्वेकडील शेवटच्या टोकावरील हे गाव "गोंदापूर" ग्रामपंचायत भोक्सापूर अंतर्गत येणाऱ्या या गावची स्थापना 1990 ला झालेली असून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेती हा आपला परंपारिक व्यवसाय करून आपलं जीवन जगण्यासाठी गेल्या 30 वर्षापासून राहतं आहेत. 20 वस्तीच्या या गावाला शाशन आज न उद्या येईल व आपल्याकडे लक्ष देईल व आपल्या गरजा व अपेक्षा पूर्ण करेल या आशेचे किरण घेऊन बसलेल्या या गावाकऱ्यांना गेले 30 वर्ष लोटूनही अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या या गावाचां गेल्या 30 वर्षापासून अपेक्षाचा भंग झाला आहे.या गावात पांदण रस्ता सुद्धा नसल्याने.येण्या जाण्याची साधी सोय सुद्धा नाही.
मानवाची मूलभूत गरज समजली जाणारी पिण्याच्या पाण्याची साधी सोय, वीज कनेक्शन,सुद्धा आजपर्यंत या गावापर्यंत नाही.उन्हाळ्यात ये-जा करण्यासाठी मोटारसायकल जाण्यायेण्यापूरता रस्ता गावकऱ्यांनी श्रमदान करून बनवलेला रस्ता हा सतत संत्ततधार अतिवृष्टी पावसाने पूर्णपणे खंदून वाहून गेल्याने आतातरी या गावाचा पूर्णच संपर्क तुटला असल्याने या गावात येण्याजाण्याची तुटकी फुटकी सोय सुद्धा नसल्याने महिलांची दिलिवरी सुद्धा या गावकऱ्याना आपल्या गावातच करावी लागते याचा नाहक त्रास त्यांना नेहमीचाच सहन करावा लागत आहे.ग्रामपंचायतीने तर या गावाला साधा पादंन रस्ता सुद्धा दिलेला नसल्याने नेहमीचच दुर्लक्ष केलेल्या या गावाला पंचायत समितीने सुद्धा कधी लक्ष दिलेल नाही. तसेच शासनाने सुद्धा या गावाची कधी या गावाची दखल घेतलेली नाही.या गावात साधा पांदंन रस्ता नाही, विज कनेक्शन नाही, हातपंप नाही, अंगणवाडी केंद्र नाही,शाळा नाही,या डिजिटल जगातील मोबाईल ला कव्हरेज सुद्धा नाही.या गावाकडे नेहमीच शासनाच दुर्लक्ष केल्याने चित्र दिसत आहे.या अशा गावात आम्ही जगायचं तरी कस हा प्रश्न गावावंशीयांनी उपस्थित केला केला आहे. गावात आजपर्यंत कोणत्याही शाशकीय योजना पोहचलेल्या नाहीत.त्यामुळे मानवाचे जीवन जणू हे जंगली जनावरा सारखे जगावे लागत असल्याचे गावकरी बोलत आहेत. #Gondapur