Top News

ममता भोजनालयात मालक दाम्पत्याची आत्महत्या. #Death


मेसमध्येच गळफास घेतलेले मृतदेह आढळले.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपुरात भोजनालय चालवणाऱ्या संचालक दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर असलेल्या भोजनालयातच गळफास घेतलेल्या अवस्थेत दुबे दाम्पत्याचे मृतदेह आढळले. मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्येच्या तीन-चार दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. #Death

🥛जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय सतरा वर्षांचा "भुजंग".

नेमकं काय घडलं?

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर माँ ममता भोजनालय आहे. या भोजनालयाचे मालक चंद्रभान दुबे (60 वर्ष) आणि त्यांची पत्नी मंजू दुबे (50 वर्ष) यांनी आत्महत्या केली. दोघांचेही मृतदेह भोजनालयातच आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत......

भोजनालयाच्या लगतच्या टॉवर टेकडी, जुनोना रोड बाबुपेठ येथे दुबे दाम्पत्याचे वास्तव्य होते. भोजनालयात गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळले. त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने ही आत्महत्या 3 ते 4 दिवसांपूर्वी केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. चंद्रपूर शहर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने