Top News

भरदिवसा झालेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू. #Firing #death


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे भरदिवसा एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुसद-वाशिम रोडवर ही घटना घडली आहे. एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी इम्तियाज खान नामक 32 वर्षीय तरुणावर बंदुकीतुन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात एक गोळी तरुणाच्या डोक्यात लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. #Firing #death
रुग्णालयात उपारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांकडून मृत घोषित......

गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तेथील स्थानिकांनी तातडीने तरुणाला उपचारासाठी स्थानिक मेडिकेआर रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव इम्तियाज खान आहे. इम्तियाज हा मेकॅनिकल इंजिनिअर असून तो पुसद येथील अरुण ले आऊट येथे राहतो. मृतकाचा एसआरएसी मोटर वर्क अँड ऑटो नावाचं गॅरेज आहे.
पोलिसांचा तपास सुरु.....

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तरुणावर गोळीबार कुठल्या कारणासाठी झाला? याचा शोध पोलीस घेत आहे. पुसद येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता अधिक तपास करीत आहेत. मृतकावर आर्म ॲक्ट तसेच वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीतूनच मृतकावर गोळीबार तर झाला नाही ना ? याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने