लोकमत इफेक्ट.....
जि.प.सदस्य राहुल संतोषवार यांनी दिली मदत.
पोंभूर्णा:- जन्मापासून फक्त दुधच पिऊन जगतोय १७ वर्षांचा भुजंग या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. सदर भुजंग ची माहिती मिळताच केमारा - देवाडा खुर्द जि.प.क्षेत्राचे सदस्य राहूल संतोषवार यांनी लोकमतची बातमी वाचून थेट भुजंगचे घर गाठले. व आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुजंगच्या वडिलांकडे आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये दिले. यावेळी सरपंच बंडू बुरांडे, उपसरपंच विनोद बुरांडे,ग्रामसेवक बंडू बारसागडे,शाहूजी मडावी, सोमनाथ टिकले , वैशाली मडावी, दिपलक्ष्मी घोंगडे, देवरावजी सोमनकर, चंद्रशेखर झगडकर उपस्थित होते. #Help
भुजंगचं जगणं म्हणजे त्याच्यासाठी संघर्ष आहे. भुजंगचा बालपण यामुळे हरवत आहे. वृद्ध आई-वडीलाची आर्थीक परस्थिती बिकट असल्याने त्याला पर्याप्त दुध देऊ शकत नाही. पैशाची कमतरता असल्याने त्याला भरपेट दुध ही पाजू शकत नाही. यामुळे भुजंग अनेकदा उपाशी पोटी झोपलेला आहे. वृद्ध आई-वडील आहेत यापुढे भुजंगचा सांभाळ कसा करतील हा प्रश्र्न उभा आहे. भुजंगला वैद्यकीय व आर्थिक मदतीची गरज आहे.
भुजंगला मदत करायची असल्यास भुजंग व त्याचे वडील यांचे संयुक्त बॅंक खाते आहे.
Name - Bhujang gurudas madavi & gurudas hari madavi
Bank - indian Bank, pombhurna
Ac/no - 6552033841
Ifc code - IDIB000P071
यावर आपली मदत पाठवू शकता.