Click Here...👇👇👇

सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था नागभीड व सासाकवा हेल्थ फाउंडेशन जपान यांचा संयुक्त उपक्रम. #Pombhurna

Bhairav Diwase

कुष्ठरोग व कोविड -१९ विषयी गैरसमज बाळगु नये:- डॉ. अमोल बावणे.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था नागभिड सासाकवा हेल्थ फाउंडेशन जपान यांच्या संयुक्त समन्वयाने covid-19 सपोर्ट फार अफ्फेक्टेड बाय लेप्रसी या प्रकल्पाअंतर्गत पोंभुर्णा येथे कुष्ठरोग व कोरोना जनजागृती प्रदर्शनीचे उद्घाटन प्रसंगी कुष्ठरोग व कोरोना याबाबत गैरसमज बाळगू नये असे प्रतिपादन कुष्ठांतेय अधिकार मंचचे तालुका अध्यक्ष डॉ. अमोल बावणे यांनी केले. #Pombhurna
🟥
पोंभुर्णा, चिंतलधाबा, नवेगाव मोरे येथे कुष्ठरोग व covid-19 ची जनजागृती करण्यासाठी प्रदर्शनी लावण्यात आली. अजूनही कुष्ठरोग याविषयी समाजामध्ये गैरसमज भीती अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे कुष्ठांतेयाप्रती घ्रुना, कलंक तसेच भेदभाव केला जात आहे. तशी वागणूक मिळू नये व कुष्ठांतेयांना सन्मानित जीवन जगता यावे यासाठी शास्त्रीय माहिती, उपचार  याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच कोरोना ची  लक्षणे, उपचार काळजी व शासकीय नियमांचे पालन  यावर माहिती दिली. महत्वाचे म्हणजे कोरोणाची लस घेतलेल्या लोकांची सेल्फी फोटो घेऊन मी लस घेतली. तुम्ही पण घ्या असा संदेश  दिला. कोरोनावरील असलेली सुरक्षित लस घेण्यासाठी समाजातील लोकांना प्रेरित करण्यात आले.  
                         
       यावेळी कुष्ठांतेय अधिकार मंचचे तालुका अध्यक्ष डॉ. अमोल बावणे, डॉ.महेंद्र ठेंगणे माजी. सरपंच  दशरथ फरकडे, उपसरपंच रोशन ठेंगणे, कुष्ठरोग तंत्रज्ञ महेंद्र शेडमाके, कुष्ठरोग तंत्रज्ञ रंगारी मॅडम,  सहाय्यक शिक्षक  अनिरुद्ध भसारकर, मिलिंद बारसिंगे, शरद निकुरे, रंजीत कांबळे, समीर वांढरे आदी उपस्थित होते.