🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पोलिसांसमोरच नवदाम्पत्याला मारहाण. #Police #Beating


लग्नाला विरोध असल्याने मुलीकडील मंडळीचा राग अनावर.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा शहरातील शिवाजी वार्डातील एका ३५ वर्षीय तरुणीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन विवाह केला. त्यानंतर काही कामानिमित्त हे दाम्पत्य पत्नीच्या माहेरी आले असता दोघांनाही मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे राजुरा पोलीस ठाण्यातील पोलीस तिथेच उपस्थित होते. त्यांच्या समोरच ही मारहाण करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या जखमी दाम्पत्याला राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पोलीस घटनेची माहिती घेत आहे. #Police #Beating
विद्या हिरामण देठे या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील मरण पावल्या नंतर आई व विद्या आपल्या शिवाजी नगरातील घरी राहत होत्या. कोरोना काळात आईचे निधन झाले. त्यामुळे विद्या एकट्याच राहत होत्या.
दरम्यान विवाह ग्रुपमधून त्यांचे लग्न जुळले. यानंतर मात्र अचानक देठे परिवाराने या लग्नाला विरोध केला. मात्र हा विरोध न जुमानता विद्याने संजय पाटील यांच्याशी बुद्ध विहारात लग्न केले. बुधवारी त्यांचे नोंदणी पद्धतीने लग्न होणार होते. त्यासाठी आपल्या पतीसह विद्या राजुरा येथे आल्या होत्या. यापूर्वी विवाहाला विरोध करीत देठे परिवाराने या दोघांना मारहाण केली होती. त्याची तक्रार त्यांनी राजुरा पोलीस ठाण्यात यापूर्वी दिली होती. पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. तक्रारदार महिलेला महाविद्यालयातील ऑनलाईन गुणपत्रिका व इतर काम असल्याने कॉम्प्युटर, ओळखपत्र व अन्य काही कागदपत्रे पाहिजे होती. त्यासाठी मागणी केल्याप्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल सह हे दोघे शिवाजी नगरातील घरी गेले.
यावेळी भाडेकरूंनी हे दोघे आल्याची माहिती देठे कुटुंबीयांना दिली. त्यांनी तिथे येऊन पोलिसांसमोरच विद्या आणि तिच्या पतीला काठीने बेदम मारहाण केली. यावेळी तिचा पती बेशुद्ध होऊन पडला. मात्र कुणीही मदतीला आले नाही. याची माहिती ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांना मिळताच त्यांनी पोलीस कुमक पाठविली. मात्र यावेळी देठे कुटुंबीय पळून गेले. पोलिसांनी दोन्ही जखमींना राजुरा उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वृत्तलिहिपर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंद केला नव्हता. पोलीस तपास सुरू आहे.