महिलेची गळफास घेत आत्महत्या. #Suicide


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजूरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील एका महीलेने स्वताच्या राहते घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. २८ जुलै ला 3:30 वाजताच्या सुमारास उघळकीस आली आहे, घटनास्थळी विरुर स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी व त्यांच चमु दाखल झाल असुन पंचनामा करून शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. #Suicide
पत्रतील मजकुर ...

मि मंगला हनुमंत मडावी मला एक बिमारी आहे ते मला आतच खात आहे, माझा नवरा मला खचप प्रेम करतो, मला त्याला सोडुन जायच नाही पन काय करू जाव लागेल आई - वडीलांना‌ माझा आखरीचा नमस्कार मला माझा बाळा जवळ जायच आहे. अस आत्महत्या केलेल्या महीलेनी एका पत्रात लिहून ठेवल होत.

घटनेचा अधीक तपास विरूर स्टे. पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी,प्रल्हाद जाधव,विजयकुमार मुंडे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या