🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

लोकसभेत गोंधळ घालणारे 10 खासदार निलंबित. #Suspended


नवी दिल्ली:- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी 10 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या खासदारांना कार्यकाल संपेपर्यंत निलंबित राहावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे आणि कागद फेकणे या कारणांसाठी दहा खासदारांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. #Suspended
या 10 खासदारांचं निलंबन...

लोकसभा अध्यक्षांचा अवमान केल्याप्रकरणी 10 खासदारांचं निलंबन झालं आहे. हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांसमोर येऊन त्यांच्यावर कागद फेकत होते.

१) मणिकम टागोर
२) दिन कुरिकोसे
३) हेबी एडन
४) एस. ज्योतिमणी
५) रौनित बिट्टू
६) गुरजित औजला
७) टीएन प्रथपन
८) व्ही. वैथिलिंगम
९) सप्तगिरी शंकर
१०) दीपक बाज
यांचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. या निलंबनानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
भाजपची टीका....

या खासदारांनी लोकशाहीचा अपमान केला असून यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होत असल्याचा आरोप भाजपने मंगळवारी केला होता. या खासदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
लोकसभा अध्यक्षांचा इशारा.....

लोकसभेत गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कमालीचे संतप्त असल्याचं सांगितलं जात आहे. अशा प्रकारे एखादा खासदार जर दुसऱ्यांदा गोंधळ घालताना दिसला तर त्याला पूर्ण टर्मसाठी निलंबित करण्यात यावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
साभार:- news 18 Lokmat