तरुणीच्या बाजूला वीज पडल्याने जखमी. #Lightningstrikes


गोंडपिपरी:- गोंडपीपरी तालुक्यातील तारसा खुर्द येथील शेत शिवारात काम करताना तरुणीच्या बाजूला वीज पडल्याने ती जखमी झाली आहे. गोंडपीपरी तालूक्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. शेतीला पूरक पाऊस पडल्याने शेतकामा ला वेग आला आहे.पावसा अभावी रखडलेली रोव्हणीची कामे जोमाने सुरू झाली आहे. #Lightningstrikes
अश्यातच मौजा तारसा खुर्द येथील शेतात 6-7 स्त्रीया रोव्हणी करत असतात विजेचा कडकडाट झाला. आणि 20 वर्षीय तरुणीच्या बाजूला वीज कोसळल्याने विजेच्या धक्क्याने जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे योग्य उपचार करून प्रकृती सुधारल्याने शुक्रवारला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या