व्यसन मुक्ती संघटनेच्या फलकाचे अनावरण. #Adharnewsnetwork #Pombhurna

Bhairav Diwase


पोंभूर्णा:- राष्ट्र संत परम पूज्य शेषराव महाराज दारू व्यसन मुक्ती संघटना पोंभूर्णा यांच्या वतीने राज राजेश्वर मंदिर येथे व्यसन मुक्ती मेळावा व सत्कार समारंभ याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. #Adharnewsnetwork  #Pombhurna
 
दारूमुळे मानवास अनेक आजार निर्माण होत असून व्यासानाधिंतेमुळे अनेक छोटे मोठे वाद उत्पन्न होतात त्यातूनच अनेक संसार सुद्धा उध्वस्त होतात ही बाब लक्षात घेता शेषराव महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांचे उतराधिकारी संतोष महाराज यांच्या मार्गदर्शनात नुकताच पोंभूर्णा तालुक्या स्थळी राजेश्र्वर मंदिरात दारू व्यसन मुक्ती चा कार्यक्रम घेऊन व्यसन मुक्त झालेल्यांच्या सत्कार करण्यात आला.

       त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित व्यसन मुक्त संघटना चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, व्यसनमुक्ती संघटना गडचिरोली जिल्हा अध्यक्ष  भाऊराव ठाकरे,संजय बुटले, भालचंद्र रोहनकर, धमा नीमगडे, खापणे , सामाजिक कार्यकर्ते सूरज गोरंतवार, संघटना सचिव पोंभूर्णा  विजय वासेकर, पोंभूर्णा अध्यक्ष मारोती वाकुडकर, साईनाथ कुनघाडकर , हे उपस्थित होते.
           
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन विजय वासेकर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार मारोती वाकुडकर यांनी मानले त्यावेळी कार्यक्र माच्या यशाशवितेकरिता कपिल बुरांडे, प्रमोद गुरूनुले, संतोष बुरांडे आदींनी परिश्रम घेतले.