शहर काँग्रेस अध्यक्षपदी दत्तु येल्लूरवार तर सचिवपदी जयंत टेकाम यांची नियुक्ती.
पोंभुर्णा:- पोंभूर्णा शहर काँग्रेस कमेटी कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सोनिया गांधी यांचा दृष्टीकोन व त्यांच्या उद्दिष्टाचे महत्व ओळखून भारतीय कांग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली व नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या आदेशानुसार खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे मार्गदर्शनानुसार आणि चंद्रपूर (ग्रामीण) कांग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे मान्यतेने नियुक्ती करण्यात आली. #Pombhurna #CityCongress.
यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करतांना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सदस्य, कांग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सुयोग काम करून कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष कवडूजी कुंदावार यांचे वतीने करण्यात आले.
पोभूर्णा शहर काँग्रेस अध्यक्षपदी दत्तु येल्लूरवार उपाध्यक्षपदी अमोल देवतळे, नरेंद्र गिरसावळे, बंडू गुरनूले कोषाध्यक्षपदी निखील आरबेडवार, सचिव जयंत टेकाम सहसचिव रामा कस्तुरे, संघटक सुधीर बल्लावार, शैलेश टेकाम, सहसंघटक सतीश बावणे, अनिल टेकाम, प्रशांत फुलझेले, तर सदस्यपदी सुरज पद्मगिरीवार, अनिल भोयर, दिनेश बुरांडे, कपिल बावणे, कार्तिक सोनुले, विजय बोले, विकास गुरनुले, सचिन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.
पोंभूर्णा शहर काँग्रेस कमेटीची कार्यकारिणी हिराई रेस्ट हाऊस चंद्रपूर येथे ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नवयुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, पोंभुर्णा तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष कवडू कुंदावार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ शिंदे, रुषी पोल्लेलवार, सोमेश्वर कुंदोजवार उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत