Top News

पदवीधर डी.एड. शिक्षकांनी संघटितपणे लढा द्यावा. #Teachers

पदमा तायडे यांचे आवाहन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती1
भद्रावती:- मागिल ४० वर्षांपासून पदवीधर डी.एड.शिक्षकांवर सतत अन्याय होत असून या अन्यायाच्या विरोधात पदवीधर डी.एड.शिक्षकांनी संघटित होऊन लढा द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाच्या अध्यक्षा पदमा तायडे यांनी राज्य कार्यकारिणीच्या सभेत केल्याचे महासंघाचे जिल्हाध्यक्ष देविदास जांभुळे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जांभुळे यांच्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्रात बहुसंख्य शाळा खाजगी व्यवस्थापनाकडून चालविल्या जातात.शाळांचे संचालन महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नुसार केले जाते.प्राथमिक शाळांत १ ते ४ किंवा १ ते ७ तर माध्यमिक शाळांत ५ ते १० किंवा ५ ते १२ चा समावेश आहे. शेड्युल 'ब' मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या अर्हतांचा समावेश आहे. १९८१ च्या नियमावलीत पदवीधर डिप.टी. शिक्षकांचा समावेश 'क' प्रवर्गात होत होता. डिप.टी. अभ्यासक्रम १९७९ मध्ये शासनाने बंद करुन त्याचे नामाभिधान डी.एड.(दोन वर्षे पाठ्यक्रम) असे केले आहे. त्यामुळे पदवीधर डी.एड.शिक्षकांचा समावेश 'क' प्रवर्गात होतो.एस.एस.सी.,डी.एड.(दोन वर्षे पाठ्यक्रम) शिक्षक उपस्नातक अर्हतेत येतो. तर पदवीधर डी.एड.शिक्षक स्नातक अर्हतेत येतो.
शेड्युल 'फ' सेवाज्येष्ठतेकरीता आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार प्रवर्ग 'अ' ते 'ह' दहा टिपासहीत दिलेले आहे. पदवीधर डी.एड.शिक्षक पदवी प्राप्त तारखेला 'क' प्रवर्गात येतो. परंतू यांचा तारणहार नसल्याने तसेच या शिक्षकांना याची जाणिव होऊ न दिल्याने सतत अन्याय होत आहे. त्यांच्यावर अतिरिक्ततेची सतत टांगती तलवार असते. त्यांच्यावर वरिष्ठ-निवड श्रेणीत, वेतनश्रेणीत आणि पदोन्नतीत अन्याय केला जातो. हा अन्याय हे शिक्षक मुकाट्याने सहन करताना दिसतात.असेही पदमा तायडे यांनी सभेत म्हटल्याचे जांभुळे यांनी प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
सभेत महासंघाचे कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड, महासचिव बाळा आगलावे, उपाध्यक्ष बंडूभाऊ धोटे, राजेंद्र मसराम, विश्वनाथ मघाडे, प्रवीण जाधव, कोषाध्यक्ष शहाबन हुसेन यांनी नियम १२ नुसार सेवाज्येष्ठतेत न्याय मिळत नसेल तर संघटितपणे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याकडे अपिल करावी असे आवाहन केले असल्याचेही जांभुळे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
#Teachers

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने