सुनील उरकुडे कृषी व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडून तात्काळ मागणीची दखल.
वरोरा:- मेसा ग्रामपंचायत गावांमध्ये सुनील उरकुडे कृषी व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशान्वये पाळीव जनावरांचे आरोग्य औषध उपचार शिबिर घेण्यात आले. मेसा ग्रामपंचायत गावांमध्ये पाळीव जाणारांना चौखूरे, व इतर रोगांची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती यांचा त्रास शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना होत होता यांचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई वाकडे व मेसा ग्रामपंचायतील उपसरपंच नीलकंठ वरभे यांनी मा श्री सुनील भाऊ उरकुडे कृषी व पशु संवर्धन सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे केली त्यांच्या मागणीची दखल घेत तात्काळ पशु अधिकाऱ्यांना सूचना देत पाळीव पशु जनावरांचे आरोग्य शिबिर घेण्याचे आदेश दिले. #warora
दि. 20/0 7 /2021ला रोज मंगळवार ला मा डॉ शेंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनात पाळीव जनावरांचे औषध उपचार आरोग्य शिबिर घेण्यात आले. प्रमुख उपस्थिती उपसरपंच निलकंठ वरभे ,तंटामुक्ती अध्यक्ष बाबारावजी खाटीक, पोलीस पाटील सौ मयुरी सतीश वरभे तसेच संजय ढोक जनावर उपचारक व पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी ,गावातील नागरिक सतीश वरभे ,दशरथ खाटीक ,वसंतरावजी मुंगले ,होमराज घुमे , सुमीत वरभे , सोनल वंजारी ,शंकर वंजारी ,गणेश मुंगले ,पशु मालक शेतकरी वर्ग व गावकरी वर्ग उपस्थित होते .उपसरपंच निलकंठ वरभे यांच्या मागणीला यश मिळाले व गावकरी वर्गाने त्यांचे आभार मानले. तसेच शिबिराला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.