किराणा दुकानाच्या गोडाऊनमध्ये ९१ हजाराची चोरी. #Theft #91thousand

Bhairav Diwase

भद्रावती:- येथील एका किराणा दुकानाच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांनी ९१ हजार ३०० रुपयांचा माल चोरुन नेल्याने शहरात खळबळ माजली असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. #Theft #91thousand #bhadrawati
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती शहरातील मंजुषा लेआऊट येथील रहिवाशी अमोल उपगन्लावार यांचा किराणा वस्तुंचा व्यवसाय आहे. त्यांचे गजानन महाराज प्रवेशद्वाराजवळ परिश्रम किराणा स्टोर्स नावाचे दुकान आहे. या किराणा दुकानाजवळच किराणा व्यवसायी चेतन गुंडावार यांच्या घरासमोर उपगन्लावार यांचे गोडावून आहे.
दि.१८ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोडावूनचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व आतील ६३ हजार रुपये किंमतीचे स्नेहा कंपनीचे १५ लिटर मापाचे ३० पिपे, २७ हजार रुपये किंमतीचे स्नेहा कंपनीचेच १लिटर मापाचे १२ पाॅकीट असलेले १५ खर्ड्याचे बाॅक्स आणि १३०० रुपये किंमतीच्या पारले-जी बिस्किटाच्या दोन पेट्या असा एकूण ९३ हजार ३०० रुपये किंमतीचा किराणा माल चोरट्यांनी लंपास केला.
दरम्यान दि.१९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता चेतन गुंडावार यांना गोडावूनचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी लगेच अमोल उपगन्लावार यांना फोन करुन गोडावूनचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली.अमोल यांनी लगेच गोडावूनकडे धाव घेतली असता वरील सर्व प्रकार कळला. त्यांनी याबाबत भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सुरु आहे.