Top News

कोरोना महामारी रद्द झालेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करा. #Railway

इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वे गाडीचा थांबा विरुर रेल्वे स्टेशनला द्यावा.

माजी आमदार अँड संजय धोटे यांची रेल्वे व कोळसा राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या कडे पत्राद्वारे मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील तेलंगणा सिमेच्या जवळ असलेल विरुर स्टेशन हे गांव,या गावाभोवती अनेक गावाचा संपर्क असून येथील गावालगत अनेक अनेक गावाचा समावेश होतो,विरुर येथे रेल्वे स्टेशन अस्तित्वात असून,कोरोना महामारी मुळे या रुळावरून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे,कारण या रुळावरून जाणाऱ्या गाड्या या स्टेशन वर थांबत नसल्यामुळे विरुर तसेच परिसरातील नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे,या मार्गावर जाणाऱ्या रेल्वे रामगिरी पॅसेंजर, भाग्यनगर पॅसेंजर तसेच अजनी पॅसेंजर या रेल्वे गाड्या या मार्गावर धावत असून काही महिन्यापासून या सर्व पॅसेंजर गाड्या बंद आहे,तरी या सर्व गाड्या लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे,
याअडचणी संदर्भात ही बाब येथील नागरिकांनी माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या लक्षात आणून दिली,पॅसेंजर रेल्वे गाड्याचा थांबा विरुर रेल्वे स्टेशन येथे देण्यात यावा या संदर्भात माजी आमदार अँड संजय धोटे यांनी केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे पत्राद्वारे माहिती देताना सांगितले की,विरुर स्टेशन येथील नागरिकांना सुरू झाल्यास येथील उद्योग वर्गांना तसेच व्यापारी बांधवाना यांचा फायदा होईल तसेच,पॅसेंजर चालू झाल्यास याचा नागरिकांना कमी पैश्यात प्रवास करता येईल व प्रवास सुखद राहील,माजी आमदार अँड संजय धोटे यांनी ना.रावसाहेब दानवे पाटील यांच्या कडे पॅसेंजर रेल्वे गाड्याची माहिती देताना सांगितले.
भाग्यनगर पॅसेंजर गाडी नंबर 17233 ही गाडी सिकंदराबाद ते बल्लारपूर,व गाडी नंबर 17234 ही गाडी बल्लारपूर ते सिकंदराबाद ही गाडी रोज या मार्गावर धावत असते,तसेच रामगिरी पॅसेंजर गाडी नंबर 57121 ही गाडी काजीपेठ ते बल्लारपूर,व गाडी नंबर 57124 ही गाडी बल्लारपूर ते काजीपेठ या मार्गावर धावत असते,व अजनी पॅसेंजर गाडी नंबर 57135 ही गाडी काजीपेठ ते अजनी,व गाडी नंबर 57136 अजनी ते काजीपेठ ही गाडी सुद्धा या मार्गावर नेहमीत धावत असते,तसेच इंटरसिटी एक्स्प्रेस गाडी नंबर 02771 ही गाडी सिकंदराबाद ते रायपूर व गाडी नंबर 02772 ही गाडी रायपूर ते सिकंदराबाद रोज विरुर स्टेशन रुळावरून धावत असते या गाडीचा थांबा विरुर रेल्वे स्टेशन येथे दिल्यास येथील नागरिकांना सोयीस्कर होईल,या सर्व गाड्या विरुर रेल्वे स्टेशन येथे सुरू झाल्यास येथील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले,जनतेची मागणी लक्षात घेता या सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या व इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा देण्याकरिता रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करून माजी आमदार अँड संजय धोटे यांनी विनंती केली आहे.
 #Railway

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने