पत्नी अन् मुलीनेच रचला कट. #Murder


सुपारी देऊन पोलिस कर्मचाऱ्याचा केला गेम.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- पत्नी आणि मुलीनेच कट रचून एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि मुलीसह अन्य एका संशयित आरोपीला अटक केली आहे. हत्येची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं हाती घेतले.

पोलिस हवालदाराची धारदार चाकूने गळा कापून हत्या. 
       तपास करत असताना हत्येचे धागेदोरे मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि मुलीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. आरोपी मायलेकींनी सुपारी देऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची हत्या घडवून आणल्याची बाब चौकशीतून समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
         संबंधित घटना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील धोडराज येथील आहे. तर जगन्नाथ सिडाम असं हत्या झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. 4 जुलै रोजी मध्यरात्री मृत पोलीस हवालदार नागेपल्ली याठिकाणी आपल्या निवास्थानी असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्यांची हत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. अहेरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर यांनी या हत्याकांडाचा तपास आपल्या हाती घेतला. अवघ्या काही दिवसांतच हत्येचा उलगडा केला आहे.
         या प्रकरणाचा तपास सुरू असताना, संबंधित हत्याकांडात मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा आणि मुलीचा हात असल्याची माहिती उघड झाली आहे. आरोपी मायलेकींनी सुपारी किलरद्वारे सिडाम यांची हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपास स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृतकाची पत्नी, मुलगी आणि एका आरोपीला अटक केली आहे. या हत्याकांडात अन्य दोन आरोपींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
        मायलेकींनी पोलीस हवालदार जगन्नाथ सिडाम यांची हत्या कोणत्या कारणातून घडवून आणली आहे, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत