विवाहित युवकाची विष करून आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- लग्नानंतर गंगासागर हेटी येथे घरजवाई म्हणून राहणाऱ्या 30 वर्षीय युवकाने शेतात कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. आशिष मारोती बोरकर (वय 30) असे मृताचे नाव आहे. 10 वर्षांपूर्वी आशिषचे लग्न नागभीड तहसीलच्या गंगासागर हेटी येथील मुलीशी झाले होते. त्याच्या सासर्‍याला मुलीच असल्यामुळे ते सासरच्या घरात जमाई म्हणून राहायचे. #Suicide
आज शेजारच्या सावरला गावाजवळ धान शेतात धान्याचा पेरणीसाठी तयार असलेला शेतात त्याच्या मृतदेह आढळला. त्याची माहिती आज कुटूंबाला मिळाली. याबाबत नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टम करीता नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला. PI खैरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बलदार पठाण, बिहारे, रामटेके, रूपेश घोंगे आदी तपास करीत आहेत.