विहिरीत उडी घेत तरुणाची आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase

सिंदेवाही:- सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रत्नापुर येथे 32 वर्षीय युवकाने घरगुती वादातून लहरी गावालगत असलेल्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मृतकाचे नाव नितीन रामकृष्ण पात्रे असे आहे. काही वेळात या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला असून पुढील चौकशी ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात ASI ठोके व नवरगाव चौकीचे पोलिस करीत आहे.