Click Here...👇👇👇

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची सावली तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट. #visit

Bhairav Diwase



(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जीबगाव, बोथली, पाथरी येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी आज आकस्मिक भेट दिली. यावेळी सध्या सुरू असलेल्या लसीकरनाबाबत चर्चा करण्यात आली. #visit #saolinews


आतापर्यंत झालेल्या लसीकरण बाबत चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात येणाऱ्या साथीच्या रोगावर नियोजन बाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, ऑक्सिजन सिलेंडर, बेड ची उपलब्धता, औषधी साठा, अंबुलन्स, सोयी सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तशेच कोरोना आजारावरील लसीकरण याबाबत माहिती देण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट रोखण्याबाबत, जास्तीत जास्त लसीकरण करण्याबाबत, जनजागृती करण्याबाबत चे निर्देश वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले.

ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामदे आर्टिपीसिआर व अँटीजन चाचण्या होत आहेत त्या केंद्रामध्ये चाचणीची संख्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून साथ रोग प्रतिबंधक उपाय योजना तयारी तशेच डेल्टा प्लस या आजरा बाबतची तयारी याबाबत सुद्धा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेण्यात आली.