वर्धा नदीच्या काठावर आढळले मृतदेह. #Wardhariver #Corpses

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- सतत 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चंद्रपुर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातील सर्व नदी, नाले, बंधारे ओसंडून वाहु लागले आहेत. बऱ्याच घरांची पडझड झाली, शेती पाण्याखाली आली, रस्ते बंद झाले, घरात, दुकानात पाणी शिरले. २ दिवसा अगोदर  राजुरा तालुक्यातील एक इसम पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. #Wardhariver #Corpses 
अश्यातच आज मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवार 24 जुलै रोजी 11:30 वाजताच्या सुमारास धानोरा गावाजवळील वर्धा नदीच्या काठावर २ मृतदेह शेतात काम करणाऱ्या नागरिकांना दिसले. एक मृतदेह पुरुषाचा असून दुसरा मृतदेह महिलेचा असलेची प्राथमिक अनुमान आहे. नागरिकांद्वारे घुग्घुस पोलिसांना माहिती देण्यात आली.
     पोहवा. उमाकांत गौरकार, निलेश तुमसरे, सचिन वासाडे यांनी घटना स्थळी जाऊन पंचनाम केले. मृतदेह हे पाण्याच्या प्रवाहात वाहून आले असावे परंतु या मृतकांची ओळख पटली नसून मृतदेह शवविच्छेदना साठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.