Top News

जि. प. उच्च प्राथ. शाळा घनोटी नं. 1 येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले व वृक्षारोपणाचा कार्यक्रम. #Treeplantation


पोंभुर्णा:- स्वातंत्र्य दिनानिमित्त जि.प. उच्च प्राथ. शाळा घनोटी नं. 1 येथे स्वतंत्रता दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला मनोहरभाई पटेल कृषि महाविद्यालय हिराटोला येथील विद्यार्थी मयुर महादेव देऊरमल्ले याने जि. प. उच्च प्राथ शाळा व ग्रामपंचायत घनोटी तुकूम येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. #Treeplantation
या कार्यक्रमात सरपंच सौ यशोदा ताई ठाकरे व उपसरपंच वैशाली ताई बुरांडे उपस्थित होत्या. तसेच शाळेतील मुख्यध्यापक मा. पेंदोर सर व शिक्षक खोब्रागडे सर व गावातील नागरिक उपस्थित होते. #Adharnewsnetwork
या कार्यक्रमाच्या औचित्याने विविध प्रकारची झाडे लावण्यात आली व मानवी जीवनात झाडांचे महत्व लक्षात घेता एक व्यक्ती एक झाड हा नारा देण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने