चामोर्शी तालुका कलावंत न्याय हक्क समिती गठीत. #Chamorshi

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- तालुका कलावंत न्याय हक्क समितीची सभा १९ ऑगस्ट रोजी प्रगती सभागृहात जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा नाट्यलेखक पुंडलिक भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. #Chamorshi
सभेत तालुका कलावंत न्याय हक्क समिती गठित करण्यात आली यात अध्यक्षपदी हरीष वाळके तर उपाध्यक्षपदी दिलखुश कुनघाडकर, सचिव किशोर आत्राम ,सहसचिव संदीप कुरवटकर ,कोषाध्यक्ष अखिल भसारकर ,प्रसिद्धीप्रमुखपदी प्रकाश घोगरे ,मार्गदर्शक व सल्लागार के .रविकुमार ,तर सदस्य म्हणून राजेश ढुमणे ,दिनेश बोरकर ,लीलाधर म्हरसकोल्हे ,जितू झाडे , डोमदेव वनेवार ,प्रशांत चुधरी , यांची निवड करण्यात आली .सभेत दिवंगत नाट्यकलावंत तुलशी चहारे , ताराचंद उराडे ,भारती काळे , मंगेशकुमार टेंभुरने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. #Adharnewsnetwork
 यावेळी मार्गदर्शन करताना नाट्यलेखक पुंडलिक भांडेकर म्हणाले की तालुक्यात अनेक नवोदित नाट्यकलावंत आहेत .अंगी कला असूनही असंघटित असल्याने कलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध होत नाही त्यामुळे कलाकारांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून कलावंत न्याय हक्क समिती कार्य करीत असते यासाठी तालुक्यातील कलावंतांनी तालुका  समिती पदाधिकारी यांचेशी संपर्क करावे असे आवाहन याप्रसंगी केले . सभेचे प्रस्ताविक जिल्हा कलावंत न्याय हक्क समिती प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भांडेकर यांनी केले तर संचालन राजेश ढुमणे व आभार दिलखुश कुनघाडकर यांनी मानले सभेला तालुक्यातील कलावंत उपस्थित होते .